नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

नाशिक  शहरात सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुमाकूळ आहे. शहरात सकाळच्या सत्रात चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात.

गंगापूर रोड, भद्रकाली, पंचवटी परिसरात या घटना घडल्यात. चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने हिसकावून नेलेत.

सकाळीच घडलेल्या या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण आहे. शहरात एकीकडे नाकाबंदी करून हेल्मेटसक्तीच्या नावाखाली लाखो रुपये नागरिकांकडून वसूल केले जातात. त्याचवेळी चोरटे खुलेआम लोकांना लुटून पसार होतायेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *