नवी मुंबई महापालिका कर्मचारी संपावर, रूग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली

नवी मुंबई  महापालिकेतील सफाई कामगार संपावर गेल्याने महापालिका  रूग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली  आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपामुळे ५ मृतदेह शवविच्छेदनाविनाच पडून आहेत.

रात्री ११ वाजल्यापासून या मृतदेहांची हेळसांड सुरू आहे. काल रात्रीपासून मृत व्यक्तींचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी बसून आहेत. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीये. रूग्णालयातही रूग्णांचे हाल सुरू आहेत. साफसफाई होत नसल्याने रूग्णालात दुर्गंधी पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *