संभाजी’ महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे

झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘ संभाजी’ मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे.

एका शानदार पत्रकार परिषदेत या मालिकेतील मुख्य भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांचा लूक सादर करण्यात आला.

संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या मालिकेचा विशेष दोन तासांचा भाग २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

त्यानंतर २५ सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता या मालिकेचे प्रसारण सुरु होईल. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे.

संभाजी महाराजाची ओळख महाराष्ट्रातील तरूण जनतेला व्हावी यासाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आल्याचे अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *