फेसबुकवर अनफ्रेंड केल्याची माहिती देणार अॅप

फेसबुकवर तुम्ही कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याची माहिती मिळते मात्र जर कोणी तुम्हाला अनफ्रेंड केले असेल तर याची माहिती मिळत नव्हती. आता ही माहिती मिळणे शक्य होणार आहे.

‘हू डिलिटेड मी ऑन फेसबुक ‘नावाच्या अॅपद्वारे तुम्हाला कोणी अनफ्रेंड केल्याची माहिती मिळणार आहे. ज्याप्रमाणे ट्विटरसाठी अनफॉलो मी असे अॅप आहे त्याचप्रमाणे हे नवे अॅप काम करते. जर तुम्हाला कोणी अनफ्रेंड केले तर या अॅपमध्ये त्याबाबतचे नोटिफिकेशन मिळेल.

तुमच्या फेसबुकवरील फ्रेंड लिस्टवर हे अॅप नजर ठेवून असणार आहे. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. मात्र हे अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी कोणी अनफ्रेंड केल्यास त्याची माहिती मिळू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *