१३ वर्षाच्या मुलीचे ते बाळ दोन दिवसात दगावले

मुंबईतील १३ वर्षांच्या बलात्कारपिडीत मुलीने गेल्या आठवड्यात बाळाला जन्म दिला होता. हे बाळ रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दगावले आहे.

वडीलांचा मित्र असलेल्या एका तरूणाने या मुलीवर सातत्याने बलात्कार केल्यानं ही मुलगी गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली होती. या आदेशानुसार शुक्रवारी या मुलीला जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. .त्याच दिवशी या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या मुलीने १.८ किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला होता.  पण जन्मत:च श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागल्याने या बाळाने जगात येताच अवघ्या ४८ तासाच्या आत निरोप घेतला.

सिझेरियन पद्धतीने प्रसूती

३२ आठवड्यात गर्भाची पुरेशी वाढ झालेली असते, त्यामुळे या मुलीचा गर्भपात न करता कुटुंबीयांच्या परवानगीने या मुलीची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती.

गर्भपाताची परवानगी

या मुलीचं वय अवघे १३ वर्षे असल्याने तिला गर्भपाताची परवानगी दिली जावी अशी याचिका मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *