देहराडूनमध्ये नदीतून वाहणाऱ्या कारमधून लोकांना वाचवताना शिडी तुटली

उत्तराखंडात पावसाने थैमान माजविले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने राजधानी देहरादूनच्या नालीपानी भागात जोरदार पावसाने नदी उफाळून वाहू लागली आहे.

नदीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. यात रस्त्यावर उभी असलेली गाडी या पुराच्या पाण्यात अडकली. गाडी नदीत वाहू लागली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली.

पूर ओसरल्यावर लोकांनी कारमधील लोकांना काढण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी एक शिडी या ठिकाणी लावली. एक व्यक्ती या शिडीवरून गाडीतील महिलांना काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक शिडी तुटली.

व्यक्ती आणि ती महिला पाण्यात पडली. मग लोकांनी जरा दूर वाहत गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला आणि महिलेला पाण्यातून बाहेर काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *