भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

पोहायला गेलेल्या तिन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडाऱ्यात घडली आहे. तुमसर   तालुक्यातील सुंदरटोला गावात ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान सरीयाम (वय वर्ष ९), प्रणय सरीयाम (वय वर्ष १०) आणि सारिका सरीयाम (वय वर्ष ११) या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

सुंदरटोला गावाजवळच असलेल्या तलावात पोहायला हे तिघेही गेले होते. तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या तिघांच्या मृत्यूने संपूर्ण सुंदरटोला गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *