मुंबई लोकल चक्क धुक्यामुळे उशीराने

आज चक्क धुकं अवतरल्यानं विरार – कर्जत – कसारा मार्गावरुन येणाऱ्या लोकल गाड्य़ा काही मिनीटे उशीराने धावत होत्या.

यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी  कार्यालय गाठणा-या प्रवाशांना धुक्याची अनुभुती घेता आली असली, तरी लोकल मात्र उशीराने धावतांना अनुभवायला मिळाल्या.

मुंबई उपनगरीय लोकल सेवा उशीरा धावण्यासाठी कोणतेही कारण असू शकते. इतर वेळी ओव्हर हेड तुटणे, रुळाला तड़ा जाणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे.

  पावसाने रुळावर पाणी येणे तर कधी चक्क ओव्हरहेड वायरवर कुत्रा पडणे अशा काहीही घटना घडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *