मंदिराचा कळस काढताना कामगार खाली कोसळला

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या देखाव्याचा कळस काढताना एक दुर्घटना झाली आहे. कळस काढताना एक कामगार  खाली कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मुख्य मंडपाचा कळस काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

वसंत जाधव नावाचा एक कामगार कळस काढण्याचं काम करत होता. क्रेनच्या साहाय्याने कळस काढण्याचं काम सुरु होतं. मात्र, त्याच दरम्यान जाधव मंडपाच्या बाजूच्या पत्र्यावर पडला आणि त्यानंतर रस्त्यावर कोसळला.

या दुर्घटनेत जाधव गंभररीत्या जखमी झाला असून त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *