पत्नी लारा दत्तामुळे महेश भूपतीची मेहनत पाण्यात

मुंबईत झालेल्या पावसाचा फटका सर्वांनाच बसला आहे. भारताचा माजी टेनिसपटू महेश भूपती याला सुद्धा याचा फटका बसला. मात्र, तो मुंबईत कुठेही पावसामुळे अडकला नाही. पण त्याची पत्नी अभिनेत्री लारा दत्तामुळे त्याला चांगलाच राग आला आहे.

लाराने केलेल्या या प्रकाराला एकप्रकारे महेश भूपतीच्या मेहनतीवर तिने पाणी फेरले असेच म्हणावे लागेल. मुंबईत झालेल्या मुसळधार अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेही ठप्प या पावसामुळे ठप्प पडली. महेश भुपतीची पत्नी लारा दत्तालाही या पावसाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. पावसाचं पाणी आपल्या घरात येऊ नये, यासाठी लाराने आपला पती महेश भुपतीच्या विम्बल्डन, ग्रँड स्लॅम, यूएस ओपन स्पर्धेतील टॉवेलचा वापर केला. यानंतर लाराने याचा फोटो काढत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला.

लाराच्या ट्विटला महेशने लगेच रिप्लाय दिला. त्यात तो चांगलाच संतापला असल्याचे जाणवले. ‘अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ते मिळाले’, असे त्याने म्हटले आहे.

काही मिनीटातचं हा प्रकार ट्विटरवर व्हायरल व्हायला लागला. अनेक मान्यवर व्यक्तींसह नेटीझन्सनी यावरुन लारा दत्ताचं ट्रोलिंग करायला सुरुवात केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *