गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात पुन्हा ४२ मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिल्ह्यात गोरखपूरमधील बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निष्काळजीपणाचं प्रकरण समोर आलं आहे. मागील ४८ तासात येथे ४२ मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ७ मुलांचा मृत्यू ताप आल्यामुळे झाला आहे.

याच महिन्याच्या सुरुवातीला याच रुग्णालयात २८ तासात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. ऑक्सीजनची सप्लाय बंद केल्यामुळे ही घटना घडली होती. ज्यानंतर बीआरडी कॉलेजचे प्रिंसिपल डॉक्टर राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ. पूर्णिमा शुक्ला यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *