एटीएम मशिन्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह

एटीएम मशिन्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह

अलाहाबादमधील जंघई परिसरातील एटीएम मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकताना एका इसमाला विजेचा शॉक लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रोजच्या वापराचा भाग झालेल्या एटीएम मशिन्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसात भिजलेले ब्रिजेश कुमार यादव हे एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी गेले. एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकताच त्यांना विजेचा जोरदार झटका लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्रिजेशला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे. एटीएम मशीन जुन्या इमारतीमध्ये असून या घटनेनंतर बॅंकेच्या अधिका-यांनी एटीएमची पहाणी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक दिगंबर कुशवाहा यांनी दिली. या एटीएममध्ये काही तांत्रिक बिघाड किंवा वायरिंगमध्ये काही गडबड झाली होती का? याचा शोध अधिकारी घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *