शाळेचं छत कोसळून २ विद्यार्थी ठार

अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी गावात जिल्हा परिषद शाळेचं छत कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर तीन विद्यार्थ्यी जखमी झाले आहेत.

जखमी विद्य़ार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचवीचा वर्ग सुरू असताना अचानक छत कोसळलं.  बेसावध असलेल्या दोघा विद्यार्थ्यांच्या डोक्यातच छताचा भाग कोसळला आणि ते जागीच ठार झाले.

गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत, ही शाळा फक्त दहा ते बारा वर्षापूर्वी बांधली गेली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *