साताऱ्यात दीड वर्षाच्या मुलीचा स्वाईन फ्लून मृत्यू

जिल्ह्यातील उंब्रजमधील स्वाईन फ्लू  झालेल्या दीड वर्षाच्या  मुलीचा मृत्यू  झाला. पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर उंब्रजमध्ये स्वाईनच्या दहशतीचे वातावरण आहे.

दीड वर्षीय स्वरा थोरात हिला रूबी रुग्णालयात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. काही दिवसापासून कराड तालुक्यात मसूर परिसरात तीन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

या घटना ताज्या असतानाच उंब्रज येथील दीड वर्षांच्या स्वराला पंधरा दिवसापासून ताप व सर्दी झाली होती. त्यानंतर तिच्यावर  मसूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *