गंगापूरमधील जैन मंदिरात चोरी, अज्ञात चोरट्यांनी परिसरातील दुकानंही फोडली

औरंगाबाद जिल्हातील गंगापूर शहरातील जैन मंदिरातून सोमवारी पहाटे चोरट्यांनी तीन मूर्ती लंपास केल्या. यासोबतच किराणा दुकान आणि कपड्याच्या दुकानांनाही चोरट्यानी लक्ष केलं. मंदिरातील मुर्तीसह तीन ठिकाणी चोरी झाल्यानं शहरात  खळबळ उडाली आहे.

सोमवारी पहाटे चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला. एकाच रात्री ३ ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. आंबेडकर चौकातील जैन मंदिराला या चोरट्यानी लक्ष करत मंदिरातील तीन मूर्ती चोरून नेल्या. एवढ्यावरच हे चोरटे थांबले नाहीत, तर याचं रस्त्यावरील शिवाजी चौक येथील लाहोटी किराणा या दुकानाचे दोन्ही शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानातील सामान लंपास केलं. त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या ‘माऊली’ या कपड्याच्या दुकान फोडून या दुकानातही चोरी केली. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरी झालेल्या सर्व स्थळांची पाहणी करून पंचनामा करण्याच काम सुरु आहे. तिन्ही ठिकाणच्या चोरीत नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *