रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी सुटल्याने युवकाचा मृत्यू

उत्सुकतेपोटी रिव्हॉल्व्हर  पाहणाऱ्या युवकाच्या हातून चुकून गोळी सुटल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तेथे त्याचे निधन झाले. हा प्रकार नांदगाव  तालुक्यातील ढेकूमध्ये शनिवारी दुपारी घडला.

लष्करी जवानाच्या घरात हा प्रकार घडला. मामेभाऊ आतेभावाकडे आला होता. यावेळी लष्करात असलेल्या भावाचे रिव्हॉल्व्हर उत्सुकतेपोटी मामेभाऊ पाहत होता. मात्र, रिव्हॉल्व्हर लोड झालेले होते. पाहता पाहता चुकून गोळी सुटली आणि मामेभावाच्या शरीरात गोळ्या घुसल्यात. या तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान निधन झाले.

याप्रकरणी मामेभावाच्या पुतण्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आतेभावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *