बीडमध्ये पुन्हा दरोडा, सराफा दुकानं लुटली

बीडमधील गेवराईत झालेल्या सशस्त्र दरोडा आणि हत्याकांडाचे प्रकरण घडून २४ तास उलटले नाहीत तोच  बीड  तालुक्यातील नेकनूरमध्ये चोरट्यांनी पोलीस स्टेशनसमोर असलेली चार दुकानं फोडून लाखोंचा माल लंपास केलाय.

नेकनूर पोलीस स्टेशनपासून जवळपास १०० फूट अंतरावरील दोन सराफांच्या आणि दोन इतर दुकानांवर रात्री चोरत्यांनी डल्ला मारला. दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश करीत चोरट्यानी लाखो रुपयांचा माल तसेच रोख रक्कम पळवून नेली

गेवराई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चोरट्यानी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *