श्रमदानातून रस्त्यांची दुरुस्ती

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग-रोहा रस्ता, कुरुळ आर.सी.एफ. वसाहत ते बेलकडे फाटा व सहाण-पाल्हे रस्त्यावर पडलेले खड्डे, साईडपट्टय़ा साफ करणे व रस्त्याकडेची नालेसफाई रविवार,  २० ऑगस्ट २०१७ रोजी करण्यातआली.

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या खड्डयांमुळे अनेक नागरीकांना मानेचे व कमरेचे आजार निर्माण झाले तसेच वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन  अलिबाग रेवदंडा मार्गाची श्रमदानातून रस्ता दुरुस्ती करण्यात आली.

अलिबाग, मुरुड हे पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. परंतू रस्त्यावरील खड्डयांमुळे पर्यटकांनी येथे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या पर्यटनावर आधारित व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. या सर्व बाबींची दखल घेउन  डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २० ऑगस्ट २०१७ रोजी अलिबाग-सहाण रस्ता, कुरुळ आर.सी.एफ. वसाहत ते बेलकडे फाटा व सहाण-पाल्हे  रस्ता या भागात पडलेले खड्डे भरण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा साईडप्ट्टय़ा साफ करण्यात आल्या. रस्त्याच्या बाजूच्या नाल्यातील गाळ काढण्यात आला. तसेच तुंबलेल्या मोऱ्या साफ करण्यात आल्या. या कामासाठी लागणारे ५५ ब्रास साहित्य व ४ जे.सी.बी., ३ रोड रोलर, २० छोटा हत्ती टेम्पो ही यंत्रसामुग्री प्रतिष्ठान तर्फे पुरविण्यात आली. यावेळी ४ हडीक ५००  सदस्यांनी सहभाग घेवून रस्ते बुजविण्याचे कार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *