ठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण

रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला अश्लील हावभाव करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. टोईंग  वाहनावरील वाहतूक पोलीस  कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार होऊनही त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसाने केला नाही, असा दावा तरुणीच्या पालकांनी केला आहे.

ठाण्यात मुलींबाबतचे गुन्हे कमी होण्याचं नाव घेत नाही.. ठाणे इथे वसंत विहार भागात राहणारी २१ वर्षीय तरूणी रिक्षाने प्रवास करत असताना टोईंग व्हॅनमधल्या कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याची घटना उघड झाली आहे. त्याचा जाब रिक्षाचालकाने विचारताच त्याला आणि तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर कर्मचारी पळून गेले.

युवतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. चौघांवर छेडछाडीचे कलम लावून गुन्हा नोंदवणयात आलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टोईंग वाहनावर पोलीस कर्मचारी होता. त्याच्यासमोरच हा प्रकार घडला तरी त्याने या कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, नाही असा पीडित तरुणीच्या पालकांचा आरोप आहे.

आता या घटनेनंतर टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या मुलांची पडताळणी करूनच कामावर ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *