अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर झालीच नाही. एमकेसीएलच्या तांत्रिक घोळामुळे कट आॅफ मंगळवारी दुपारी ३ वाजता जाहीर करणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
पहिल्या दोन कट आॅफनंतर तिसऱ्या कट आॅफची वाट पाहणारे विद्यार्थी सायंकाळी ५ वाजल्यापासून प्रतीक्षेत होते. मात्र सायंकाळी ८ वाजता संकेतस्थळावर कट आॅफ मंगळवारी जाहीर होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

