फ्रिजरमध्ये लपून तिनं लाइव्ह ट्विट केला हल्ला

गोळीबाराचा जोरदार आवाज येतोय… शस्त्रधारी पोलिसांची धावाधाव सुरू आहे… ते कुणाचा तरी शोध घेताहेत… खूप गडबड सुरू आहे… जीव वाचावा म्हणून आम्ही देवाकडं प्रार्थना करतोय.”

ही सगळी ट्विट आहेत, भारतीय वंशाची ब्रिटनमधील अभिनेत्री लैला रॉस हिचे. बार्सिलोना हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेल्या लैलानं हॉटेलमधील एका फ्रिजरमध्ये लपून हे ट्विट केले आहेत. गुरुवारी रात्री स्पेनमधील बार्सिलोना इथं एका दहशतवाद्यानं व्हॅन गर्दीत घुसवून हल्ला केला. त्यात १४ लोक ठार तर सुमारे १०० लोक जखमी झाले आहेत.

हा हल्ला झाला तेव्हा लैला बार्सिलोनातच होती. तिच्या १० वर्षांच्या मुलीला घेऊन सुट्टी घालवायला ती इथं आली होती. ती राहत असलेल्या हॉटेलच्या बाहेरच दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याची माहिती कळताच ती हादरून गेली. नेमकं काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. पण काहीतरी भयंकर झालंय हे तिला कळून चुकलं होतं. मुलीला घेऊन ती हॉटेलच्या स्टाफच्या मदतीनं फ्रिजरमध्ये लपली. पण त्याही परिस्थितीत जीव मुठीत धरून ती तिथल्या घडामोडींबद्दल लाइव्ह ट्विट करत होती.

लैला रॉस ही ब्रिटनमधील लोकप्रिय टीव्ही स्टार आहे. आई भारतीय व वडील मोरोक्कन असलेल्या लैलानं १९९०मध्ये भारतातील चॅनेल ‘व्ही’मधून टीव्ही करियरची सुरुवात केली होती. ब्रिटनमधील एका स्नूकर खेळाडूसोबत तिनं विवाह केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *