घोडबंदर रोड २४ तास बंद राहणार

घोडबंदर रोडवरील वाढते अपघात टाळण्यासाठी घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाच्या जवळ पदचारी पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. या कामासाठी कापूरबावडी नाका ते मानपाडा नाका दरम्यानचा मार्ग २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ९ पासून रविवारी सकाळपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. या कालावधीत निर्धारित  केलेल्या बदलानुसार वाहतूक मार्गक्रमण करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

गुजरात येथून घोडबंदर मार्गे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली असून ही वाहने मनोर चवींद्र वडपे नाका राजनवली, मानकोली, खारेगाव या पर्यायी मार्गाचा वापर करु शकतात.  मुंबईकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूबावडी अंजूर फाटा, चिंचोटी ते वसई या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी सर्विस रोड आणि इतर मार्ग खुले राहणार आहेत. या कालावधीत काही नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून वाहतूक पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *