स्पेनमध्ये दहशतवादी हल्ला, १३ नागरिकांचा मृत्यू

स्पेनमधील बार्सिलोना  येथे दहशतवादी हल्ला  झाला आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका कारने काही नागरिकांना चिरडलं. या दुर्घटनेत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर त्या परिसरातील मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लॉस रामब्लास परिसरात एका वाहनाने नागरिकांना चिरडलं. या घटनेनंतर परिसरातील मेट्रो आणि रेल्वे स्टेशन बंद करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *