तरुणीचा पाठलाग करणाऱ्यांना अटक;अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या

मुंबई : तरुणीचा स्कुटर वरुन पाठलाग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अंबोली पोलिसांनी आवळल्या आहे. असीरा तरन्नुम (२५) अस या तरूणीचं नाव आहे. दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन गाडीचा अर्धवट नंबर असूनही अवघ्या दोन तासात त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असुन ते दोघे महाविद्यालयीन तरुण असल्याचे अंबोली पोलिसांनी सांगितले. कली फर्ड सॅम्युएल सुशी अमाना (२५) आणी सागर सिंग(२१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नवे असून ते अंधेरी पुर्वच्या मरोळचे राहणारे आहेत.

असीरा मीडिया प्रोफेशनमध्ये असून बुधवारी रात्री एकच्या सुमारास अंधेरी परिसरातुन रिक्षाने घरी परतत होती. ती रिक्षात बसण्याआधीच दोन इसम स्कुटरवरुन तिचा पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. ते दोघे तिचा पाठलाग करत तिच्यबाबत अश्लील शेरेबाजी करत होते. तेव्हा आपल्या मैत्रिणीला फोन करून मदत मागण्याचे तिने ठरविले. मात्र त्यापुर्वी हिम्मत करत तिने त्या दोघांचा फोटो काढून मुंबई पोलिसांना ट्विट केले. त्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत काही सेकंदातच पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आणि ते दोघे आरोपी पसार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *