बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या   केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

शेख दानिश अफजल या १२ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या मुलाने ब्लू व्हेल गेमच्या आहारी गेल्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान, ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. केरळमधील एका तरुणाने ‘ब्लू व्हेल’ गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तरुणाने आपल्या घरात गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळचं वळणं लागल्याचं दिसत आहे.

११व्या इयत्तेत शिकणा-या मनोजने गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्याच्या आईने दावा केला आहे की, ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाईन गेममुळेच माझ्या मुलानं आत्महत्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *