शाहिद कपूर आज चढणार बोहल्यावर

शाहिद कपूर आज चढणार बोहल्यावर

उत्तम नृत्यकौशल्यासोबतच आपल्या दमदार अभिनयामुळे रसिकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहिद कपूर आज बोहल्यावर चढणार आहे. गुरगाव येथे होणा-या शानदार समारंभात शाहिद दिल्लीस्थित मीरा राजपूतशी विवाहबद्ध होणार आहे. या लग्न सोहळ्यास शाहिद-मीराचे कुटुंबिय आणि मोजकी जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
बॉलिवूडमधील शाहिदच्या इतर सहकलाकार मित्रांसाठी मुंबईत शानदार रिसेप्शन आयोजित करण्यात आले असून अनेक स्टार्स या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वराला शुभेच्छा देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *