‘मुलाच्या वडिलांचे नाव उघड करण्याचे बंधन नको’

‘मुलाच्या वडिलांचे नाव उघड करण्याचे बंधन नको’

एखादी अविवाहित महिला माता बनल्यास तिला तिच्या अपत्याचे पालकत्व घेण्यासाठी त्याच्या वडिलांचे नाव जाहीर करणे बंधनकारक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

न्यायाधीश विक्रमजित सेन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, एखाद्या मातेला तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव उघड करायचे नसेल तर त्या मुलाचे पालकत्व ठरविण्यासाठी ते आवश्यक नाही.

एका अविवाहित महिलेने तिच्या मुलाच्या पालकत्वासाठी त्याच्या वडिलांचे नाव जाहीर करावे लागू नये यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिलेला निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला. अशा प्रकरणांवर निर्णय देताना त्या मुलाचे कल्याण व्हावे याला सर्वांधिक महत्त्व द्यायला हवे. त्या मातेला वडिलांचे नाव उघड करायचे नसल्यास न्यायालयाने त्याचा आग्रह धरू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *