भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला आहे. नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडी शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आले असून माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
