Flight नं प्रवास करणाऱ्यांची बोंब! महाराष्ट्रात पाच मार्गांवरील विमानसेवा बंद; कोणत्या शहरांवर होणार परिणाम?

पर्यटन, व्यवसाय, महत्त्वाची कामं या आणि अशा अनेक कारणांनी मंडळी प्रवास करतात. प्रवासाची ही सुविधा सुकर होते ती म्हणजे विविध साधनांच्या उपलब्धतेमुळं. त्यातही मागील काही वर्षांमध्ये विमानप्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांचा आकडासुद्धा लक्षणीयरित्या वाढला आहे. महाराष्ट्रातूनही विविध शहरांतून देशाच्या बऱ्याच राज्यांना आणि शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा पुरवल्या जातात. मात्र, येत्या काळात राज्यातून Flight नं प्रवास करणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण असेल बंद होणाऱ्या पाच विमानसेवा.

उपलब्ध माहितीनुसार अवघ्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरातील महत्त्वाच्या पाच विमानसेवा बंद होणार आहेत, दिल्ली,मुंबई, बंगरुळू हैदराबाद आणि गोवा या विमानसेवा तत्कालीन स्वरुपात बंद होणार आहेत. त्यामुळं शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आठवड्याला तब्बल 3 हजारांनी घटणार आहे. यामुळे दररोज सरासरी 437 प्रवासी कमी येण्याची, तर महिन्याला 13 हजारांहून अधिक प्रवाशांची घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *