जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी ही घटना घडली. मोबाइल वापरण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादावरून झालेल्या गोळीबारात मेजरला गोळी लागल्याचं वृत्त आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. या घटनेची माहिती मिळतात सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मेजरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.
