नाशिक – पुणे विमानसेवा आजपासून सुरू

नाशिक – पुणे विमानसेवा आजपासून सुरू

नाशिक-पुणे विमानसेवा अखेर आजपासून सुरू झाली आहे. मेहेर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मेरीटाईम हेली एअर म्हणजे मेहेर कंपनी सी-प्लेनसाठी प्रसिद्ध आहे.

गाडीनं नाशिक-पुणे अंतर कापण्यासाठी साडेचार-पाच तास लागतात. तर हेच अंतर हवाईमार्गे फक्त ५० मिनिटांत पार करता येणं शक्य आहे.

दुहेरी प्रवासासाठी पहिल्या आठवड्यात ७ हजार ४९९ रूपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर १३ जुलैपासून दर वाढणार आहेत. ही विमानसेवा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास नाशिकच्या उद्योजकांना आहे.

अनेक अडचणीनंतर नाशिक-पुणे विमानसेवा सुरू झाल्याने नाशिककर आणि पुणेकर खुश आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *