केरळ किनारपट्टीवरुन संशयित बोट ताब्यात

केरळ किनारपट्टीवरुन संशयित बोट ताब्यात

केरळच्या समुद्रात कोस्टगार्डनं संशयित बोट पकडली आहे. त्यामध्ये पाकिस्तानचं ओळखपत्र असलेले 12 लोक बोटमध्ये होते. शिवाय सॅटेलाईट फोनही बोटमध्ये आढळून आला आहे.

कोस्टगार्डसह आयबी आणि केरळ पोलीस बोटीमधल्या 12 जणांचा तपास करत आहेत. समुद्रात 100 किलोमीटर दूरवर एक संशयित बोट फिरत असल्याची माहिती केरळ पोलिसांनी कोस्टगार्डला दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार कोस्टगार्डनं या बोटीला घेरण्याचा प्रयत्न केला. पण कोस्टगार्डपासून ही बोट वाचण्याचा प्रयत्न करत होती. या बोटमधून ड्रग्ज वाहतूक होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अखेर 4 जुलै रोजी कोस्टगार्डनं या बोटीला पकडलं आणि विंहजिगम कोस्टमध्ये आणण्यात आलं आहे. याठिकाणी कोस्टगार्ड, आयबी आणि केरळ पोलीस बोटीवरील नागरिकांची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *