इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत.
आठवड्याच्या सुरूवातीसच सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मालगाडीचे तीन डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन कराव लागत आहे. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी येथून मदतीसाठी रेल्वेचे पथक रवाना झाले आहे. मात्र रेल्वे पूर्वपदावर येण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.

