‘या’ देशात मगरीशी लग्न करण्याची प्रथा आहे

लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे. आपल्या इथे लग्नाचं नातं हे पवित्र समजलं जातं. दोन वेगवेगळ्या कुटुंबांना, भिन्न प्रवृत्तीच्या माणसांना हे नातं एकत्रं आणतं. प्रत्येक देशात लग्नाच्या पद्धती, रुढी, परंपरा वेगळ्या आहेत. आता मेक्सिकोचं पाहा ना, इथे चांगल्या भाग्यासाठी चक्क मगरीशी लग्न करण्याची प्रथा आहे.

मेक्सिकोमधल्या Oaxaca मध्ये मेअरने एका मगरीशी लग्न केलं. नुकताच त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता आपल्याला हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी तिथल्या लोकांसाठी हा नित्याचा भाग आहे. Pedro Huamelula येथे संगीताच्या जल्लोषात लग्नाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मगरीला चक्क नववधुसारखं सजवून आणलं होतं. पांढऱ्या रंगाचा गाऊन, डोक्यावर मुकूट चढवून मगरीला चर्चमध्ये आणण्यात आलं. मेअरने सर्वांसमक्ष या मगरीचं चुंबन घेऊन तिचा पत्नी म्हणून स्विकार केला.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेअरवर मगरीशी लग्न करण्याची वेळ का बरी आली असेल? याचंही उत्तर आहे. मगरीशी लग्न करण्यामागे एक अख्यायिका आहे. मगरीला हे लोक राजकुमारीचं रुप मानतात. तिच्याशी लग्न केल्यानंतर समुद्धी येते म्हणूनच दरवर्षी तिच्याशी लग्न करण्याची प्रथा आहे. मेअरने तिच्या लग्न केलं की इथल्या स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचा व्यवसाय भरभराटीला येतो, शेतात पीकही चांगले येते अशी त्यांची मान्यता आहे. म्हणून दरवर्षी इथे लग्नाचा कार्यक्रम पार पाडला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *