दुचाकीचं हे अनोखं कव्हर तुम्ही पाहिलंय?

पाऊस म्हटलं की चिकचिक, त्यात घराच्या बाहेर पडणं आणि गाडी चालवत ऑफीसला जाणं म्हणजे आणखीनच चिडचिड. मग रेनकोट घालून गेलं तरी भिजायला होतंच. मग तो कितीही चांगला रेनकोट असला तरीही. तेव्हा आपल्याकडील कल्पनावीरांना काय सुचेल सांगता येत नाही. दुचाकीवर भिजायला होऊ नये म्हणून असेच एक कव्हर बाजारात आलंय. त्यामुळे तुमचे पावसापासून संरक्षण होणार असून याच पावसात गाडीवरुन फिरण्याचा आनंदही तुम्ही लुटू शकणार आहात.

संपूर्ण दुचाकीला कव्हर करेल असा गाडीसाठीचा हा रेनकोट गाडीवर असलेल्या दोघा व्यक्तींचेही संरक्षण करणार आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे रंग आणि प्रकार उपलब्ध असून ऑनलाईन वेबसाईटवर हे कव्हर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हे कव्हर फोल्डींग स्वरुपातील असल्याने त्याची काढ-घाल करणं सोपं आहे. तसेच त्याची किंमतही हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने ते खरेदी करणं शक्य होई शकतं.

 गाडी चालवणाऱ्याला रस्त्यावरील नीट दिसावे यासाठी या कव्हरच्या समोरच्या बाजूला पारदर्शक पडदा देण्यात आला आहे. हे कव्हर वाहनचालकांचं पावसापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं संरक्षण करत असल्यानं तुम्ही जर पावसात गाडी चालवून वैतागला असाल तर याचा नक्की विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *