‘या’ एअरलाईनमधून प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागणार

पाकिस्तान एअरलाईन्समध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग तुम्हाला नक्कीच आठवत असेल आणि नसेल आठवला तर आठवण करून द्यायला आम्ही आहोतच. फ्रेबुवारी महिन्यात या एअरलाईन्सच्या कराची ते मदिना या फ्लाईटदरम्यान सात प्रवाशांनी चक्क उभ्याने प्रवास केला होता. आता उभ्याने प्रवास करायला विमान काही एसटी किंवा रेल्वे नक्कीच नाही. सुरक्षेच्या तसेच अन्य कारणांमुळे इथे प्रवाशांना उभ्यानं प्रवास करता येत नाही. पण तरीही प्रवाशांना उभ्याने नेण्याचा प्रताप यांनी केला होता. आता यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन की काय व्हिवा कोलंबियन एअरलाईन्सने एका नवी कल्पना शोधून काढलीय.

या एअरलाइन्सने प्रवास करणारे प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात का? याचा विचार एअरलाईन करत आहे. उभ्याने प्रवास करायचा झालाच तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल यावर चाचणी सुरू आहे. जर हा प्रयोग यशस्वी झालाच तर २०१८ पर्यंत उभ्याने प्रवास करता येण्याची सुविधा देण्यात येईल असंही एअरलाइन्सने सांगितलं.  उभ्याने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कमी पैसे मोजावे लागतील. त्यांचा विमान प्रवास स्वस्त होईल असंही या एअरलाईन्सच म्हणणं आहे. कमी पल्ल्यांसाठी ही सुविधा देण्यात येईल असंही म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *