राष्ट्रीय बँडमिंडनपटू गौरी पवार यांच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू

पुण्यातील राष्ट्रीय बँडमिंडनपटू गौरी पवार यांचे वडील प्रमोद पवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नगररोड रस्त्याच्या कडेला रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी पवार यांचे वडील प्रमोद पवार हे काल रात्री कोरेगाव पार्क येथे मित्राबरोबर पार्टीला गेले होते. ते रात्री दोनच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी परत निघाले होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह वाघोली येथील रस्त्यावर आढळून आला . त्यांची दुचाकीही घटनास्थळी आढळून न आल्याने हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय आहे. दरम्यान, पोलीस आता या सगळ्याचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *