पुणे – नगर हमरस्त्यावर भीषण अपघात

पुणे – नगर हमरस्त्यावर लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय.

या भीषण अपघातात सात जण ठार झालेत. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

बसमधील नागरिक देवदर्शन करुन पुण्याच्या दिशेने परतत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या टँकरला या बसची धडक बसली . ही धडक इतकी भीषण होती की सात जण जागीच ठार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *