मोबाईलची चोरी त्याच्या जीवावर बेतली

पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल हिसकावून पळून जात असताना गुद्दा वर्मी बसल्यानं मोबाईल चोराचा मृत्यू  झाला.

नजिम शेख असं मरण पावलेल्याचं नाव आहे. पिंपळे सौदागर इथल्या कोकणे चौकात दुपारी सायकलवरुन जाणा-या एका तरुणाचा मोबाईल हिसकावून, नजिम शेखनं पळून जायचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत मोबाईल मालकानं नजिमच्या पोटात गुद्दा मारला.

नजिमच्या पोटावर आधीच शस्त्रक्रिया झालेली असल्यानं, मारलेला गुद्दा त्याच्या वर्मी बसून तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायकलस्वार मोबाईल मालक फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *