चीनी सैन्याची भारतीय जवानांना धक्काबुक्की

चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केलीय. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत.

त्यामुळं सीमेवर काही प्रमाणात तणाव निर्माण झालाय. सिक्कीममध्ये चीन, भूतानच्या सीमा मिळतात त्या भारतीय हद्दीतल्या डोका ला आणि लालटेन या परिसरात चीनच्या सैन्यानं गेल्या काही दिवसात घुसखोरी केलीय.

सोमवारी चीनच्या सैन्यानं लालटेनमध्ये भारतीय सैन्याचे दोन बंकर नष्ट केले. चिनी सैन्यानं पुन्हा भारतीय घुसण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय जवानांनी मानवी साखळी तयार करून त्यांना रोखले.

 चीननं सिक्कीमच्या सीमेवरील नथू ला येथून तिबेटमध्ये मानसरोवरला जाणा-या भारतीय यात्रेकरूंना मज्जाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *