पुण्यात मुकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलीला गेलेत दिवस

मुकबधीर, गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं धक्कादायक प्रकरण उजेडात आले. गेल्या चार महिन्यांपासून प्रकार सुरु होता. मुलीला दिवस गेल्यानं हे प्रकरण उजेडात आले.

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहारूल इस्लाम अब्दुल वाहीद लस्कर ऊर्फ शाहरुख असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ती मूकबधिर आणि गतिमंद आहे. ती कचरा वेचण्यासाठी जायची. त्यावेळी आरोपी तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करायचा. ही घटना चार महिन्यापूर्वीची आहे.

 आरोपी शाहरुखने केलेल्या बलात्कारामुळे पीडित मूकबधिर मुलीला दिवस गेले आहेत. पिडीत मूकबधिर मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. या मुलीचे वडील देखील अंध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *