सोशल मीडियासाठी स्टंट करताना प्रियकराला घातली गोळी

आपण तयार केलेले व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत म्हणून अनेकजण वेगवेगळे फंडे लढवत असतात. तर काही जण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात. पण असाच जीवघेणा स्टंट अमेरिकेतील एकाच्या जीवावर बेतला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी जरा हटके स्टंट करण्याच्या नादात एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडवरच गोळी चालवली. दुर्दैवाने ही गोळी वर्मी लागल्याने तिच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला.
अमेरिकेतील मिनिसोटा येथे राहणाऱ्या 19 वर्षिय मोनालिसा पेरेज  आणि तिचा प्रियकर पेट्रो हे सोशल मीडियावर टाकण्यासाठी व्हिडिओ चित्रित करत होते.  पेट्रोने आपल्या छातीवर पुस्तक पकडले तर मोनालिसाने गोळी चालवली. ही गोळी पुस्तकात अडकेल असे त्यांना वाटले होते मात्र गोळी पुस्तकातून आरपार जात पेट्रोच्या शरीरात घुसली.  त्यातच पेट्रोचा मृत्यू झाला. मोनालिसाने जेव्हा पेट्रोवर गोळी चालवली तेव्हा हे सर्व चित्र त्यांचा एक शेजारी आणि त्याची मुलगी खिडकीतून हे दृष्य पाहत होत्या.
पेट्रो याला चर्चेत यायचे होते. सोशल मीडियावर अधिकाधिक प्रतिसाद हवा होता. त्यासाठी त्याने हा जीवघेणा स्टंट केला आणि अखेर तो त्याच्या जीवावर बेतला. दरम्यान, पेट्रोची गर्लफ्रेंड मोनालिसा पेरेज हिच्यावर पेट्रोची  हत्या केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *