नागिन डान्स केला म्हणून नवरीने मोडलं लग्न

लग्न समारंभात विशेष करून हळदीमध्ये किंवा लग्नाच्या वरातीत बिनधास्तपणे नाचताना लोक नेहमीच दिसत असतात. सध्या कोणताही कार्यक्रम हा नागिन डान्स केल्याशिवाय पूर्ण होत नाही, असं म्हणायलासुद्धा काहीही हरकत नाही. पण हा लोकप्रिय नागिन डान्स एका नवरदेवाला चांगलाच भारी पडला आहे. लग्नाच्या दिवशी दारू प्यायलेल्या नवऱ्याला नागिन डान्स करताना पाहून संतापलेल्या नवरीने चक्क तेव्हाच लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडलंसुद्धा. आपला होणाऱ्या नवऱ्याला दारूच्या नशेत नाचताना पाहून त्या मुलीची मान शर्मेने खाली गेली, म्हणूनच तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
मुलीने लग्न मोडू नये यासाठी त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिला खूप समजाण्याचा प्रयत्न केला पण ती नवरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी नवरदेवाला आल्या पावली परत फिरावं लागलं. लग्न स्थळावर मारामारी होऊ नये यासाठी पोलिसांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर एक दिवसानंतर त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी करण्यात आलं. प्रियंका त्रिपाठी या तेवीस वर्षीय तरूणीचं लग्न अनुभव मिश्राशी होणार होतं. या दोघांची कुटुंबं एकमेकांना काही वर्षापासून ओळखत होती. तसंच दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नासाठीच्या भेटवस्तूंची देवाणघेवाणसुद्धा झाली होती.
लग्नाच्या दिवशी वऱात घेऊन येताना मुलाचं लक्ष डीजेवर सुरू असलेल्या गाण्याकडे गेलं आणि त्याने त्या गाण्यावर नागिन डान्स करायला सुरूवात केली. नवरदेवाला नाचताना पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्यावर पैसे उडवायला सुरूवात केली. हे सगळं चित्र बघून मुलीच्या घरचे थक्क झाले. त्याच वेळी दारूच्या नशेत नाचणार अनुभव आपल्या लायकीचा नाही हे त्या मुलीने ठरवलं. प्रियंकाने लग्न मोडू नये साठी तिच्या घऱच्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला पण प्रियंकाने आपला निर्णय बदलला नाही. शेवटी वरात घेऊन मुलाकडील मंडळींना घरी परत फिरावं लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *