मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा, मूक मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार

  • मध्य प्रदेशात 12 वर्षाच्या अल्वपयीन मुलीवर नातेवाईकानेच बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धार येथे ही घटना घडली आहे. पीडित मुलगी मूक असून आपल्यावर बलात्कार झाल्याचंही तिला सांगता येत नव्हतं. अखेर ‘आनंद मूक बधीर संस्थे’च्या प्रमुख मोनिका पुरोहित यांच्या मदतीने मुलीने आपल्याला सामोरं जावं लागलेल्या त्या भयाण घटनेची माहिती दिली. 23 जून रोजी बलात्कार झाल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे.
     बलात्कार झाला तेव्हा पीडित मुलीचे आई – वडिल कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. घरी कोणीच नसल्याची संधी साधत नातेवाईक घरी दाखल झाला, आणि या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
    आई, वडिल घरी परतल्यानंतर मुलीने आपल्यावर ओढावलेल्या त्या प्रसंगाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने ती सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण पालकांना काहीच कळत नव्हतं. आपल्या मुलीला नेमकं काय सांगायचं आहे हे जाणून घेण्यासाठी  शेवटी त्यांनी आनंद मूक बधीर संस्थेची मदत घेतली.
    संस्थेचे प्रमुख ग्यानेंद्र पुरोहित आणि मोनिका पुरोहित यांनी पीडित मुलीला दोन बाहुल्या दिल्या. त्यांच्या मदतीने तिने आपल्यावर प्रसंगाची माहिती देत बलात्कार झाला असल्याचा खुलासा केला. ”आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. तज्ञांची मदत घेत आम्ही पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *