एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट, पश्चिम रेल्वे विस्कळीत

एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

खबरदारीसाठी रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गावरील चर्चगेट आणि बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक थांबवली आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी गाड्यांचा गोंधळ झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *