पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू  झालाय. पहिने गावात ही घटना घडलीये.

ग्राम शिरसाट आणि कौस्तुभ भिंगारदिवे अशी या मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही अभियांत्रिकी विद्यालयात शिकत होते.

पिकनिकसाठी म्हणून हे दोघेही पहिने येथील धबधब्यावर आले होते. मात्र दोघांपैकी एक जण पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता त्याचाही तोल गेला आणि दोघांचा बुडून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *