मुलांची हत्या करून पित्याने घरातच पेटविली चिता

गृहकलहातून पित्याने बलभीम (अडीच वर्षे) व वैष्णव (साडेचार वर्षे) या दोन्ही मुलांना गळा आवळून ठार मारले आणि घरातच गोवऱ्यांची चिता रचून मृतदेह जाळले. ही घटना माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेनंतर निर्दयी पिता कुंदन वानखेडे (२३) पळून गेला आहे.

संसाराची जबाबदारी सांभाळताना कुंदन व रेखा या दाम्पत्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांच्याच सतत खटके उडत होते. सहा महिन्यांपूर्वी रागाच्या भरात कुंदनने रेखाला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती रागाने माहेरी निघून गेली होती. दोन्ही मुले कुंदनकडेच होती. मुलांचा ताबा मिळविण्यासाठी रेखाने न्यायालयात दावा दाखल केला होता. २३ जूनला होणाऱ्या सुनावणीत मुले आपल्यापासून हिरावली जाण्याची भीती कुंदनच्या मनात होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *