घराच्या गच्चीवर खेळताना तारांचा स्पर्श झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

घराच्या गच्चीवर  खेळत असताना तारांचा स्पर्श झाल्याने नागपुरात स्वयम पांडे नावाच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी खेळत असताना हा मुलगा घराच्या गच्चीवर गेला.

आपल्या घराच्या गच्चीवरून तो शेजारच्या हॉटेलच्या छतावर उतरला. पण त्या छताला लागून उच्च दाबाच्या वीज तारा जात होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने स्वयमला वीजेचा धक्का बसला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातल्या नागरिकांना गच्चीवरून धूर दिसला. नागरिकांनी गच्चीवर धाव घेतली असता स्वयम विजेच्या तारांना चिकटलेला त्यांना दिसला. नागपूरमध्ये नजीकच्या काळात शॉक लागून मुलांचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी पियुष आणि प्रियांश या जुळ्या भावंडांचा अश्याच प्रकारे हायटेन्शन वायरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *