हेमा मालिनींना मुंबईत हलविणार

हेमा मालिनींना मुंबईत हलविणार

मथुरेहून जयपूरला जाताना झालेल्या अपघातात जखमी भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर हेमामालिनी यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.

हेमामालिनी यांच्या मर्सिडीज कारनं ऑल्टोला धडक दिली. यात एका ऑल्टोमधील सोनम नावाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. या चिमुकलीच्या मृत्यूबाबत हेमामालिनी यांनी दुःख व्यक्त केलंय. या अपघातात सोनमचे आई वडिल, भाऊ जखमी झालाय. त्यांच्यावर जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

शुक्रवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या अपघातातील जखमी आणि हेमामालिनी यांची भेट घेतली. दुसरीकडे या अपघातप्रकरणी हेमा मालिनी यांचा ड्रायव्हर महेश ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हेमा मालिनी यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाल्याने नाकावर प्लॅस्टीक सर्जरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *