अंथरुण ओलं केलं म्हणून चिमुरडीचा घेतला जीव

एका पाच वर्षांच्या चिमुरडीनं अंथरुण ओलं केलं म्हणून तिच्या सावत्र बापाने तिला इतकं बेदम मारलं की त्यात तिचा जीव गेला. फरीदाबादमधल्या पर्वतीया कॉलनीत ही घटना घडली. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच या मुलीच्या आईशी त्यानं मंदिरात प्रेमविवाह केला होता.

एक महिन्यापू्र्वी त्यानं या मायलेकींनी फरीदाबादमध्ये आणलं होतं. पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक चौकशीनुसार, यमुना नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने ६ वर्षांपूर्वी सन्नी नावाच्या युवकाशी प्रेमविवाह केला. एक वर्षात त्यांना एक मुलगी आली. दोन-तीन वर्षांनंतर दोघांत भांडणं होऊ लागली. एक महिना आधी ही महिला आपल्या मुलीला – रावीला- घेऊन पर्वतीय कॉलनीत राहणाऱ्या सौरभ सोबत फरीदाबादला आली आणि त्याच्यासोबत राहू लागली. सौरभ रावीला मारहाण करत असे.

सोमवारी रात्री रावीनं अंथरुण ओलं केलं. मंगळवारी सकाळी हे कळताच सौरभनं तिला खूप मारलं आणि उचलून बाथरूमच्या दरवाजावर आपटलं. डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध झाली. राग शांत झाल्यावर सौरभनं तिला खासगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित करून पोलिसांना बोलावलं. सौरभ एका फॅक्टरीत काम करतो आणि रावीची आई त्याच्या मित्राची बहिण असल्याचंही पुढे आलं आहे. सौरभला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *